
१८७४ साली म्हणजे १८५७ च्या राष्ट्रीय उठावाला अवघी १७ वर्षे झालेली असताना, महात्मा गांधी अवघे ५ वर्षांचे असताना आणि भारतातील पहिला राष्ट्रीय पक्ष काँगेस ह्याची स्थापना देखील झालेली नसताना वसईतील अर्नाळा ह्या गावी तेंडुलकर कुटुंबीयांनी बांधलेला प्रशस्त 'तेंडुलकर वाडा' आजही मोठ्या दिमाखात उभा आहे.
जवळपास दिडशे पावसाळे पाहिलेल्या आणि अजूनही भक्कम स्थितीत उभ्या असलेल्या ह्या वाड्यात भारतरत्न पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, बापूजी सुधीर फडके, महान क्रिकेटपटू अजित वाडेकर, सुनील गावस्कर, पॉली उम्रीगर इ. राहून गेलेले आहेत.
आजही राहण्याजोग्या असलेल्या ह्या वाड्याची एक छोटी झलक, त्याचा इतिहास व वाड्यात असलेल्या दुर्मिळ गोष्टींचा धांडोळा घेण्यास आम्हाला मदत करणाऱ्या श्री. हेमंत तेंडुलकर ह्यांना विशेष धन्यवाद. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास हा व्हिडीओ जरूर शेअर करा आणि हो आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटण दाबण्यास विसरू नका.
धन्यवाद!
#oldhouse #vasaiculture #tendulkarhouse
0 Comments