This programme also highlights, again through old recordings, Kishoritai’s unparalleled command over “Shrutis” and precise positions of notes in various Raagas. It also sheds some light on liberties she used to take with orthodox rules of our Raag system to create flashes of beauty, even though she did end up displeasing some purists of music.
Kishoritai composed some new Raags, and also sang some specialities of Jaipur Gharana Raagas which she rarely sang in the second half of her career. Short clips of these are also played in this programme.
Dr Dravid also makes vocal presentations of some of Kishoritai’s Bandishes in several Raagas which she sang rather sparingly in her later career.
Dr Arun Dravid presented this programme, and also the English version in Mumbai, Pune, Ahmedabad, Goa, Dombivli, and two cities in the U.S., all to standing room only audience
Other participants in this programme are Dr Arun’s Gurubhagini and current disciple Smt. Devaki Pandit as well as Tabla and Harmonium accompaniment by Milind Pote and Suyog Kundalkar for the vocal examples.
This video recording is a unique opportunity for connoisseurs, teachers and students of Hindustani classical music.
मितश्रुत किशोरी आमोणकर
(Rarely Heard Kishori Amonkar)
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या १९६० ते १९८५ या २५ वर्षांच्या कालखंडातील संगीतावर आधारित रसग्रहणात्मक कार्यक्रम त्यांचे ज्येष्ठतम शिष्य डॉ. अरुण द्रवीड, तसेच शिष्या श्रीमती देवकी पंडित या दोघांनी मिळून सादर केला आहे. किशोरीताईंच्या संगीत जीवनातील हा कालखंड निवडण्यामागील कारण असे की या काळात त्यांच्या गाण्यात जयपूर अत्रौली घराण्याचे स्वरूप जास्त स्पष्टपणे दिसत असे. जयपूर घराण्याची मुद्रा म्हणून ज्ञात असलेल्या खास जोड रागांची पेशकारी या काळात त्या जास्त प्रमाणात करीत असत. तसेच घराण्याच्या इतर खासियती जास्त ठळकपणे मांडीत असत. त्या काळातील त्यांचे गाणे जाणतेपणाने ऐकलेले श्रोते आजमितीस जरा विरळाच. तरुण श्रोत्यांना या कालखंडातील गाण्याची ओळख व्हावी आणि बुजुर्गांना पुन:प्रत्ययाचा आनंद घेता यावा ही कल्पना .
रागातील सुरांच्या योग्य श्रुति अचूकपणे लावण्याचे किशोरीताईंचे कौशल्य ध्वनिफितींच्या माध्यमातून सोदाहरण विषद केले आहे. कर्मठ संगीतज्ञांच्या दृष्टीने किशोरीताईनी काही ठिकाणी सौन्दर्य आणि भाव यांच्या वृद्धीसाठी नियम वाकवून थोडीशी बंडखोरीही केली होती. त्याचेही विवेचन केले आहे. किशोरीताईनी स्वत: अनेक बंदिशी रचल्या आहेत. त्यातील काही प्रात्यक्षिक स्वरूपी सदारकर्त्यांनी गाऊन दाखवल्या आहेत. प्रत्येक श्रवणसत्राबरोबर त्यातील गुण वैशिष्ट्यावर रसग्रहणात्मक टिप्पणी व चर्चा केली आहे.
शिवाय अनेक राग त्या काळानंतर किशोरीताईंनी पुनः कधी म्हटले नाहीत. त्यांनी स्वतः रचलेले रागही आपल्या सांगीतिक उत्तर काळात फारसे कधी म्हटले नाहीत. अशा रागांची झलक जुन्या ध्वनिफितींमधून ऐकवल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी १९६० ते १९८५ या कालखंडातील किशोरीताईंच्या अनेक मैफिलींच्या ध्वनिफीती संपादित आणि अत्यंत संक्षिप्त स्वरूपात ऐकवल्या आहेत. किशोरीताईंनी अरुण द्रवीडांना हा सर्व ध्वनिफितींचा खजिना पूर्वीपासून त्यांची रखवाली करण्यासाठी तसेच निगा राखण्यासाठी कायमचा दिला होता. बऱ्याचशा ध्वनिफीती द्रविडांनी ताईंच्या इच्छेनुसार स्वतः ध्वनिमुद्रित केल्या होत्या.
२ वर्षांपूर्वी पुण्यात सादर झालेला हा कार्यक्रम सुमारे ४ तासांचा आहे, तो सुमारे २ तासांच्या दोन भागांमध्ये सादर केला आहे.
संगीत रसिक आणि संगीताच्या अभ्यासकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक पर्वणी आहे.
Grateful thanks to Pandit Dr Arun Dravid for sharing this remarkable programme with the music lovers all over the world.
0 Comments