मुस्लिम संघटना आणि माहीम मधील मुस्लिम समाजाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा विधायकामुळे अल्पसंख्याक समाजात अस्वस्थता पसरली आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घालावं, या मागणीसाठी काही मुस्लिम संघटनेचे धर्मगुरु आणि मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंना भेटायला गेले. यात मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती शोएब आणि त्यांचं शिष्टमंडळ, मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख, जावेद शेख उपाध्यक्ष मनसे, आरिफ शेख सरचिटणीस वाहतूक सेना आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे. यावर सध्याचं सरकार मंदीवरचं लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी अशा बाबी घडवण्याचा प्रयत्न करत आहे. देशात अशांतता रहावी म्हणून कोण अशा आंदोलनाला फंडिंग करतं आहे का ? हे पहावं लागेल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. #RajThackeray #CAB #NRC #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here:
Official website:
Follow us on Instagram :
Like us on Facebook :
Follow us on Twitter :
Follow us on linkedin :

0 Comments